Blog Archive

Thursday, September 29, 2011

Marathi Jokes :)

बंड्या आणि बबडी
बंड्या आणि बबडी हॉटेलात जातात.
बंड्या : बबडे छबडे काय बरं खाणार तू... काय मागवू तुझ्यासाठी? तू फक्त सांग!!!
बबडी : बननड्या ऑम्मी नॉई ज्जॉ!!
बंड्या : अगं सांग काय ऑर्डर करू?
बबडी : अममम... ठीकॉय. जे तू खाणार ना तेच मॉलॉ पण हॉवॉय!
बंड्या : ओके डार्लिग. वेटर दोन प्लेट मिसळ. दोन प्लेट समोसा आणि दोन मस्तपैकी चहा.
बबडी : वेटर. मलॉसुद्धा दोन प्लेट मिसळ. दोन प्लेट समोसा आणि दोन मस्तपैकी चहा पायजे.

प्रेम म्हणजे...
वीजेची एक तार दुसऱ्या तारेच्या प्रेमात पडली तरी त्याला काय म्हणणार???
करंट अफेअर

मनाई
एका तलावाजवळ लावलेली पाटी-
'तलावात मगरी आहेत. तलावात पोहण्यास सक्त मनाई आहे. वाचलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल!!'


टाळा!!
पेशंट : डॉक्टर, माझा हात दोन ठिकाणी मोडलाय!!
डॉक्टर : ओके... या दोन ठिकाणी जाणं शक्यतो टाळा...

टीनाचा बैल
टीना : ओव ग्हावखरी ग्हावखरी... तुमछा बईल खित्ती शुंदर हाये. पण तुमछ्या या बईलला शिंघं खा नायत?
गावकरी : त्याचं काय अॅ ना फॉरिनर बाई. काहींची शिंग आम्ही कापून टाकतो. काहींना जन्मजातच नसतात. काहींची भांडणात तुटतात. एकंदर बरीच कारणं असू शकतात.!! पण याला शिंग नाहीत याचं कारण वेगळं आहे. कारण तो बैल नसून गाढव आहे मॅडम!

इश्पेशल आरसा
झंप्या : काय राव... या आरश्यॅत इश्पेशल ते काय हाए बरं?
दुकानदार : स्पेशल म्हणजे सॉलिड स्पेशल आहे बघा. म्हणजे तुम्ही १००व्या मजल्यावरून तो खाली फेकलात तर ९९ मजल्यांपर्यंत तरी फुटणार नाय म्हणजे नाय.
झंप्या : काय सांगता... वा वा वा... मग या प्रकारचे २० आरशे लगेच पॅक करा बघू
टेलिमार्केटिंग कॉल्स कसे थांबवाल?


अक्कल-शक्कल
नेहमीची ट्रिक : हॅलो, हॅलो.. काही ऐकू येत नाही... हॅलो, मोठ्याने बोला हो...
किंवा त्यांना सांगा- 'माझ्या काही लक्षात राहात नाही, मी लिहून घेताय' आणि एक एक शब्द परत परत विचारा...


आराम
पत्नी: डॉक्टरांनी मला एक महिना आराम करायला सांगितलाय, आणि हवापालटासाठी आठ दिवस एखाद्या हिलस्टेशनवर जायला सांगितलंय... आपण कुठे जायचं?
पती: सेकंड ओपिनियनसाठी, दुसऱ्या डॉक्टरकडे!


खडा
बंडोपंत : अरेरेरेरेरे देवा
ठमाकाकू : काय झालं आता? जेवा की मुकाट!
बंडोपंत : काय हे भातात आजही खडा. अगं देवाने चांगले दोन डोळे दिले आहेत ना तुला. मग साधा एक खडा काढता येत नाही?? कमाल आहे तुझी!!!
ठमाकाकू : ओ माझ्या दोन डोळ्यांचं सोडा. तुम्हाला एवढी बत्तीशी... म्हणजे बत्तीस दात दिलेयत ना देवाने. मग तुम्हाला एक खडा चावता येत नाही. कमाल आहे तुमची!!!!

Thank you
Vikram
KRF-CPF, Thailand

No comments:

Post a Comment